तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 42 प्रभागाच्या 112 जागेसाठी 323 अर्ज, जटामखोरा ग्रा.पं अविरोध. अखेरच्या दिवसी मचली धावपळ, मुदत वाढ व पारंपारिक पद्धतीमुळे थोडा दिलासा, आता रणधुमाळी सुरू
मनोहर घोळसे ,सकाळ वृत्तसेवा
सावनेर ता. 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील बारा ग्रामपंचायती अंतर्गत 42 प्रभागाच्या 112 सदस्यपदासाठी मंगळवार पर्यंत 110 अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी (ता.30 )नामांकन प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याने अर्ज दाखल करणाऱ्यांंची चांगलीच धावपळ मचली होती मुदत संपेपर्यंत 213 अर्ज दाखल झाल्याने आता112 जागेसाठी एकूण 323 अर्ज दाखल झाले आहेत जटामखोरा ग्रामपंचायत मध्ये सात जागेपैकी पाच जागेसाठी विरोधात अर्ज आले नसल्याने व उर्वरित दोन जागेसाठी एकाच उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केल्याने ही ग्रामपंचायत अविरोध होणार असल्याचे समजते दिवसभर अर्ज भरणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.वेळेवर जात वैधता व कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज भरणाऱ्या उत्सुकांचा जीव टांगणीवर लागला असतांंना निवडणूक विभागाच्या पारंपारिक पद्धतीच्या कामकाजाने व 5:30 वाजे पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला तालुक्यात अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 323 नामांकन अर्ज दाखल झाल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. मात्र छाणनी दरम्यान किती अर्ज बाद ठरेल व कोण माघार घेणार यावर रणांगणातील चित्र स्पष्ट होणार
* सात सदस्यांचे संख्याबळ असलेल्या जटामखोरा ग्रामपंचायत मध्ये सात सदस्यासाठी दहा नामांकन अर्ज भरण्यात आले असून यात काँग्रेस समर्थीत विकास प्रल्हाद मरस्कोल्हे ,अंकुश टिकाराम आत्राम ,सत्यफुला अविनाश उईके ,सोनू गणेश रावसाहेब ,मंगला रविंद्र उईके आदिंच्या विर”