कोरपना तालुका प्रतिनिधी
मनोज गोरे…!!
———————————–
आता तरी पंचायत समिती प्रशासनाला जाग येणार काय ?
———————————-
कोरपना
मौजा धानोली येथील घरकुल लाभार्थी आंदबाई मडावी हिला सण २०१५-१६ या वर्षी इंदिरा आवास योजने अंतर्गत व सण २०१६- १७ या वर्षी शबरी आवास योजने अंतर्गत तिच्या पतीला घरकुल मंजूर झाले होते ,परन्तु सलग चार वर्षे लोटल्या नंतरही पंचायत समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आंदबाई मडावी महीलेला अखेर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली याला पंचायत समिती जवाबदार आहे असा आरोप सरपंच विजय रणदिवे यांनी केला असून महिला सोबत स्वतः सरपंच विजय रणदिवे सुद्धा उपोषणाला बसले आहे
पंचायत समिती प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन सुद्धा लक्ष न दिल्याने अखेर आज पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले, व जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत उपोषण सोळणार नाही अशा इशारा सरपंच विजय रणदिवे यांनी दिला या वेळी नारायण हिवरकर, अरुण मडावी किशोर बावणे,शशिकांत आडकीने,रमेश पा मालेकर अमोल आसेकर पुरुषत्तम भोंगळे, बंडू सोयाम, ओम पवार, यांच्या सह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी उपोषण कर्त्याना भेट देऊन आपला पाठींबा दर्शविला आहे,