स्वपनिल कामडे
रिपोर्ट नरखेड
विदर्भ राज्य आंदोलन समिती नरखेड तालुका आणि शेतकरी संघटना यांची कार्यकारिणी सभा उदासीन महाराज मठ, नरखेड येथे पार पडली .
नरखेड : नरखेड तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक आ. राम नेवले साहेब यांनी वीज बिलात सूट देण्याचे जे आश्वासन महाविकास आघाडी व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते त्यावरून त्यांनी आपला जो शब्द फिरवला असून आता पुढे विदर्भ राज्य आंदोलन समिती वीज बिल विरोधात अधिक तीव्र आंदोलन करणार असे प्रतिपादन कार्यकर्त्यांना केले व विदर्भातील शेतकऱ्यांना १० हजार कोटी पैकी फक्त ७ कोटी २२ लक्ष इतका मदत निधी फक्त एका जिल्ह्याला देऊन उर्वरित निधी पश्चिम महाराष्ट्रात वळवून जो धोखा महाभकास आघाडीने विदर्भाशी केला आहे त्या विरुद्ध ७ डिसेम्बर रोजी तालुका स्तरावर महात्मा गांधी पुतळयाला साकडे घालून ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवणार असे आवाहन त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनीलजी वडस्कर , मा. मदनजी कामडी , मा. राजेंद्र सतई , मा. नितीन अवस्थी , सौ. रेखाताई निमजे , मा. नारायणरावजी बांदरे , मा. मणिरामजी रेवतकर , मा. दिनेशजी खत्री मा. क्षिरसागर जी , मा. वृषभ वानखेडे सभेस उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. प्रशांत तागडे तर आभार प्रदर्शन श्री. वसंतराव वैद्य यांनी केले. यावेळी रामचंद्रजी बहुरूपी,निलेश पेठे, प्रज्वल धुर्वे,मयूर नाखले, रमेशजी मुऱ्हेकर , तुषार कुऱ्हाडे , सतीश सातपुते, संकेत कुऱ्हाडे , बाबारावजी मुंदाफळे , प्रवीणजी राऊत, गोलू चक्रपाणी , ज्ञानेश्वर लाड , याधनेश्वरजी सरोदे,विष्णूजी बाणाईत , लक्ष्मणराव देशमुख, प्रकाशजी डोईजोड इत्यादी उपस्थित होते.