दिनेश चौरसिया नागपूर
वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी नागपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा काढला. मनसेचे विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात संविधान चौकातुन हा मोर्चा निघाला. कोरोना काळात ऊर्जा विभागानं भरमसाठ वीजबिल पाठवले. त्यामुळं कोरोनामुळं आधीच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना सरकारनं शॉक दिला. वाढीव वीजबिल कमी करावं यासाठी अनेकदा निवेदनं दिली. मात्र, सरकार ऐकत नसल्यानं आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांची लढाई लढत असल्याचं यावेळी हेमंत गडकरी यांनी सांगितलं. मोर्चाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडविला. शेवटी चार पदाधिकाऱ्यांनी जाऊन जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले.
बाईट : हेमंत गडकरी, विदर्भ प्रमुख, मनसे