*संपादक*
राकेश मर्जिवे
गढमंदीरावर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात
पार पडला
त्रिपूरी पोर्णिमेचा अपुर्व सोहळा
यावर्षी
कोरोनामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण … मात्र तरीही नागरिकांमधे उत्साह कायम…
फटाक्याची अतिषबाजी
रामटेक –
कोरोना विषाणू ने अख्या जगामध्ये धुमाकूळ घातलेला असून उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेक नगरीतील त्रिपुरी पौर्णिमा निम्मित पूजा अर्चना विधी या वर्षी अगदी साधे पणाने पार पडली.
शरद पोर्णिमा म्हणजेच कोजागिरीपासून सुरू झालेल्या उत्सवाचे समापन त्रिपूर जाळून करण्यात येते.
विदर्भातील विभिन्न भागातील तसेच छत्तीसगढ व मध्यप्रदेश येथील भक्तमंडळी सोबतच रामटेक व ग्रामीण परिसरातील हजारो मंडळी हा सोहळा बघण्यासाठी गडावर येत होते.
या वर्षी मात्र
कोरोनाचे प्रादुर्भाव लक्षात घेता
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार
मोजक्याच भाविकांना
कोव्हिड नियमांचे पालन करून
पूजा विधी साठी परवानगी देण्यात आली.
प्रभू श्रीराम व लक्ष्मणस्वामीचे वस्र तुपात भिजवून मंदीराच्य उंच कळसावर मुख्य पुजारी मुकुंदराव पंडेच्या हस्ते त्रिपूर प्रज्वलित होताच जय श्रीरामाच्या गजराने गढमंदीर परिसरदुमदुमून गेले.
त्रिपुरी पौर्णिमेचा सोहळा अगदी साधेपणाने, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, यांचा मार्गदर्शनात
मोजक्या भाविकांच्यया व
पोलिसांच्या चोखबंदोबस्तात पार पडला.
यावेळी संपूर्ण आध्यात्मिक पंडे सहभागी झाले होते.
दरवर्षी राम नगरितल्या प्रत्येक घरी शोभायात्रा व टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने पाहुणे मंडळी येत होते , मात्र या कोरोनामुळे सगळ्यांचा उत्सवावर विरजण पडले,
मात्र नागरिकांमध्ये उत्साह कायम होता , नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर चढून त्रिपुर जडतांना बघितले व जय श्री राम च्यया जयघोषात त्या क्षणांचा आनंद घेतला.