- अल्पवयीन सख्ख्या बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळविणाऱ्या दोन तरुणांना अटक
सावनेर ता. दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून मध्यप्रदेशात पळवून देणाऱ्या पाटण सांगी सद्भावना कॉलनीतील दोन आरोपींचा शोध घेऊन अटक केली आहे सागर राजेंद्र दुर्वे वय बावीस व आकाश सुरज सूनारिया वय 21 दोन्ही राहणार पाटणसावंगी सद्भावना नगर अशी आरोपींची नावे आहेत सावनेर पोलीस ठाणेअंतर्गत सद्भावना पाटणसावंगी येथील अल्पवयीन असलेल्या 14 व 15 वर्षे वयोगटातील दोघ्या सख्ख्या बहिणींना याच गावातील दोन तरुणांनी पाच नोव्हेंबरला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती
मुलींच्या पालकांनी नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर मुली मिळून आल्या नाहीत त्यामुळे सावनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणेदार अशोक कोळी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विशेष पथक नियुक्त केले या पथकाची जबाबदारी उपपोलीस निरीक्षक फुलझेले यांच्याकडे होती पथकाने मध्यप्रदेशातील भोपाल, इंदोर ,जबलपूर परिसर पिंजून काढला शेवटी पीतमपुर येथे मुली व आरोपी असल्याचा सुगावा पथकाला लागताच पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले मुलींना घरच्यांना सोपवून आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे सावनेर पोलिसांचे या कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक केल्या जात आहे