💐युगात्मा शरद जोशींच्या ५वे पुण्यस्मरण खरसोली येथे संपन्न💐
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
आज दि.१२/१२/२०रोज शनिवारला दु.१२वा.श्री नारायणराव बांदरे यांचे निवासस्थान खरसोली येथे साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन कामडे, प्रमूख पाहुणे .राम नेवले,मुकेश माथुरकर, सुनील वडस्कर, सौ प्रभावती डोंगरे, मनिष अवस्थी, डॉ.संजय ढोकणे, तुकारामजी क्षिरसागर, नारायणराव बांदरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलन नसून ते शेतकरयांना लुटणार्यांचे आंदोलन असल्याने त्याला महाराष्ट्र शेतकरी संघटना विदर्भ ने कडकडून विरोध केला आहे .प्रास्ताविक प्रशांत तागडे यांनी केले संचालन रामचंद्र बहरूपी यांनी तर आभार वसंतराव वैद्य यांनी मांडले.
यावेळी नरखेड तालूक्यातील हंसराज वंदे, प्रमोदजी वघाळे, नागोराव नखाते, रामदास नासरे , भाऊराव लोहे ,विजय राऊत, मनोहरराव अरसडे, गंगाधर कुकडे, वसंतराव चापले ,गोलू चक्रपाणी,प्रज्वल धुर्वे,प्रकाशराव बोंद्रे, चक्रधरजी देशमुख, धिरज मांदळे,प्रविन राऊत, अंकुश धुर्वे, डॉ. पुखराज रेवतकर ,१०० च्यावर शेतकरी उपस्थितीत होते.