संपादक.राकेश मर्जीवे..सह शीतल चिंचोरकर नागपूर गर्मीन… !!!
*रामटेक तालुक्यात ५० प्रलंबित प्रकरणांचा निपटारा*
रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दिवाणी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी (१३८)
एन.आय अॅक्ट , बँक पतसंस्थाचे दाखलपूर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीमध्ये घर व पाणी करांची प्रकरणे ठेवण्यात आली .त्यापैकी चार दिवाणी व दोन फौजदारी प्रकरणे, बँकेतील 44 दाखलपूर्व प्रकरणे, तसेच पाणी व घरकरांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
कोरोना कालावधीनंतर पहिल्यांदाच लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावून , हात सॅनिटाईझ करून , ऑक्सीमीटर चेक करून , थर्मल स्कॅनिंग करूनच आतमधे प्रवेश दिला होता.
या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन, 11 वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर , नागपूर , रामटेक तालुका विधी सेवसमितीचे अध्यक्ष एस.डी.मेहता , दिवाणी न्यायाधीश व्ही.पी. धूर्वे
तालुका वकील संघाचे सचिव एम. व्ही. येरपूडे
यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय लोक न्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी आलेले प्रमुख पाहुणे 11 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नागपूरचे एस.डी मेहता यांनी आपल्या भाषणात रामटेक तालुक्यातील लोकांनी दिवाणी दावे,
बँक किंवा पतसंस्थेतील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने लोकांनी पुढे यावे व सामंजस्याने आपसातील मतभेद दूर ठेवून आलेल्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन सहाय्यक अधिक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक येथील ए.एम.जोशी यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे इतर सदस्य हजर होते.कार्यक्रमाला एसबीआय, युको बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या सर्व बँकेचे मॅनेजर , बँकेतील कर्मचारी व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
तालुका वकील संघाचे व न्यायालयाचे कर्मचारी सहाय्यक अधिक्षक ए.एम. कोतेवार, लघुलेखक डी.एच धोपटे , वरिष्ठ लिपिक एच.बी.पराते, एम.एन. घोडमारे, वानखेडे, कनिष्ठ लिपिक डी.बी. पाकळे , डी.जी. हनवतकर, आकाश येरपूडे, एस. व्ही. डोंगरे, साकुरे , हाडे , तसेच शिपाई सुरपाम , देव व सफाई कामगार कटारे यांनी सहकार्य केले .