Home Breaking News रामटेक ग्राम पंचायत निवडणूक सम्पन्न

रामटेक ग्राम पंचायत निवडणूक सम्पन्न

284
0

♣तहसील कार्यालय रामटेक येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षण सम्पन्न।। *निवडणूक अर्ज ऑनलाईन सादर करताना खबरदारी घ्यावी – तहसीलदार बाळासाहेब मस्के रामटेक – 15 जानेवारी 2020 ला रामटेक तालुक्यातील 9 ग्रामपंचायतची निवडणूक होणार असून ग्रामपंचायत निवडणूकीचे ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा याचे प्रशिक्षण तहसील कार्यालयात देण्यात आले. निवडणूक अर्ज ऑनलाईन सादर करताना कोणती खबरदारी घ्यावी, कागदपत्रे कशी जोडावी तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कोणत्या पद्धतीने काम करावे याची माहिती देण्यात आली. फॉर्म भरतांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नायब तहसीलदार मनोज वाडे,टेक्निकल पर्सन विवेक कापगते यांच्याशी संपर्क साधून परिपूर्ण माहिती भरावी.उमेदवारांनी ऑनलाइन फार्म काळजीपूर्वक तसेच परिपूर्ण माहिती व अचूक भरावी.उमेदवार ज्या प्रवर्गातून वार्ड/प्रभागातून फॉर्म भरत आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा,असे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी यावेळी सांगितले.यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पत्रकार मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. आचार सहिन्तेचे उल्लंघन हौनार नाहिं याची कालजी घेन्याचे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यानि के ले आहै. रामटेक तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने 23 ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत,उमेदवारी अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप 4 जानेवारी ,मतदान 15 जानेवारी सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत मतमोजणी 18 जानेवारीला आणि निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्धी 21 जानेवारीपर्यंत होणार आहे.दाहोदा ,पथरई, देवलापार ,खुमारी, पंचाळा,शिवनी(भोंडकी),मानापूर, चिचाळा,किरणापूर या नऊ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होऊ घातलेले आहे.सरपंचपदाचे प्रशासन निवडणूकीच्या तयारीला लागले असून राजकीय पक्षांची ग्रामीण भागातील नेते,कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळीही उत्साहाने कामाला लागली आहे. ह्याँ निवडनुकित राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पनाला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here