सावनेर ता कापा नरसाळा येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण पार पडले…
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन खापा नरसाळा येथील सरपंच प्रमोद चाफेकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी तालुका कृषी अधिकारी कुमारी आश्विनी कोरे, राहुल सातपुते, आदित्य सेलुटे, पुरुषोत्तम काळे ,हर्षल मानकर, हर्षल घोडमारेआदींनी या प्रशिक्षणात
जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांचा संतुलित तसेच कार्यक्षम वापर करणे, माती परीक्षण करून त्याआधारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून पुढील हंगामात खत मात्रा ठरविणे, रासायनिक खतांंचा अनिर्बंध वापर कमी करणे व यातून उत्पादन खर्च कमी करण्यास जैविक खते, सेंद्रिय खते, गांडुळ खते, निंबोळी गंधकाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माती परीक्षणही करण्यात आले या प्रशिक्षणाचा विकास गायधने ,प्रकाश चाफेकर, वामन बानाईत, श्रावण धुर्वे, नरेंद्र ढिमोले, मुकेश घोळसे, नामदेव शेंबेकर ,ज्ञानेश्वर डोंगरे, सुनील बागडे, प्रभाकर घोळसे आदींसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला