Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी सवार जागिच मुत्यु एक गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी सवार जागिच मुत्यु एक गंभीर

271
0

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 12 वर्षिय मुलगा जागीच ठार दुसरा जखमी
सावनेर ता. स्थानिक गडकरी चौकातून स्कुटीने डब्लु सी एल कडे जात असतांंना विरुद्ध दिशेने येणार्‍या अज्ञात वाहनाने स्कुटीला समोरासमोर जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूटी चालक जखमी झाला तर मागे बसलेला बारा वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना सावनेर शहरात घडली.
भूषण सुरेश कुमरे वय 12  राहणार खापा असे मृतकाचे  नाव आहे तर शंकर रमेश जाधव वय 14 बजाज कॉलनी डब्ल्यूसीएल सावनेर असे जखमीचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक गडकरी चौकातून एम एच 40 बी एस 0392 ज्युपिटर वाहनाने डब्ल्यू सी एल कडे जात असतांना कोलार नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून ज्युपिटर वाहन चालक शंकर यास समोरासमोर धडक मारल्याने या धडकेत जुपिटर स्वार भूषण व शंकर दोघेही पडलेत अज्ञात वाहन चालकाने भूषणच्या अंगावर गाडी चढवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी भूषणला मृत घोषित करून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला व जखमी शंकरला उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here