केंद्र सरकारने अनुसूचित जाती तील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीत केली मोठी वाढ…
देशभरातील अनुसूचित जाती तील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अधिक सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने उच्च शिक्षण शिष्यवृत्तीत तब्बल 59 हजार कोटींची वाढ केली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाच्या मार्ग सुकर झाल्याची माहिती भाजप चे अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे । केंद्र सरकार दरवर्षी 1100 कोटी रुपये मागासवर्गीयांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून देत होते त्यामध्ये यंदा मोदी सरकारने वाढ करीत आता दरवर्षी 6 हजार कोटी चा निधीची वाढ केली आहे । यामध्ये केंद्र सरकार चा वाटा हा 60% तर राज्य सरकार ला 40% निधी देणार आहे । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक कल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 4 कोटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचेही भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी सांगितले आहे
Byte-सुधाकर भालेराव, प्रदेश अध्यक्ष-अनुसुचित जाती मोर्चा,भाजप