राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यात काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष ठरणार असल्याचं भाकीत केलं आहे. नागपूर सह संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक करिता आज शांततेत मतदान होत असून महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी अंगठा वर शाईचे निशाण दाखवून मतदान केल्याचे दाखविले. यावेळी सुनील केदार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत
निवडणुकीत महाविकास आघाडी एक नंबर वर राहील असा विश्वास व्यक्त करून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नागरिकांना केले आहे