Home शैक्षणिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्लाझ्मा डोनेशन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्लाझ्मा डोनेशन

350
0

एकुण 37 दानदात्यांनी दिला प्लाझ्मा

सावनेर – डॉक्टरांना धरेवरील देवता का म्हटल्या जाते याचे प्रत्यक्ष उदाहरण सावनेर येथे पहावयास मीळाले.एकीकडे फोफावत असलेल्या कोरोना काळात आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत संसर्गजन्य वातावरणात ही आयएमए चे सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी सावनेर शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजागृती मोहीमा राबवून तसेच ग्रामीण क्षेत्र सावनेर येथे अतिशय माफक दरात कोरोनाचा उपचार उपलब्ध करुन दिला व आता कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावा याकरिता लोकाभिमुख असे जिल्ह्यातील पहिले “प्लाझ्मा डोनेट कँम्प” चे आयोजन करुण समाजालाही आपलं काही देनं लागतं याचा परिचय देत आहेत* *त्या अनुशंगाने दिनांक 17 * 18 जानेवारीला इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने गंभीर कोविंड असलेल्या रुग्णांकरिता प्लाजमा डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे हे उदघाटक म्हणून उपस्थित होते.* *गंभीर कोविंड रुग्णांना या प्लाजमा डोनेशन चा नक्कीच लाभ होईल असे मत अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार डॉक्टर प्रवीण चव्हाण व डॉ. शिवम पुण्यानी डॉ. अमित बाहेती होते .कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ. अशिष चांडक,डॉ.उमेश जिवतोडे, कोषाध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी,आय एम ए सावनेर शाखेचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.विजय धोटे डॉ.चंद्रकांत मानकर,डॉ.श्वेता चव्हाण डॉ. नितीन पोटोडे, डॉ.संदीप गुजर, उपस्थित होते.* *कोविंड प्लाजमा दान शिबीर इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर येथे जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले प्लाजमा घेण्याचे काम जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर चे ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉक्टर अभिजीत मानकर व श्री किशोर खोब्रागडे यांनी पाहिले.* *शहरातील डॉ.परेश पिंगे डॉ. परेश झोपे डॉक्टर निलेश कुंभारे डॉक्टर शशांक कुथे यांनी प्लाजमा दान केले.याप्रसंगी प्रत्येक प्लाजमा दात्याला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.* *या शिबिरात शेवटचे वुत्त संकलनापर्यंत एकुण 40 प्लाजमा दात्यांनी प्लाजमा दान करत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.* *प्लाझ्मा दानदाते तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर शिवम पुण्यानी यांनी मानले*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here