Home सामाजिक रामटेक मधे नगर परिषद तर्फे कार्रवाई

रामटेक मधे नगर परिषद तर्फे कार्रवाई

291
0

सम्पादक राकेश मर्जिवे

 

रामटेक शहरात नगरपरिषद रामटेक तर्फे अतिक्रमनाची धडक मोहीम !

पुढेही यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येईल :- मुख्याधिकारी अर्चना वंजारी !

अँकर –

रामटेक शहरात सर्वत्र पसरलेल्या अतिक्रमणाची गांभीर्याने दखल घेत नगरपरिषद रामटेक तर्फे शहरात अतिक्रमणाची धडक
मोहीम काढण्यात आली. या कारवाईत राखी तलाव रोड, गांधी चौक परिसर व सुपर मार्केट तसेच स्ब्जी मंडी हा परिसर पूर्ण अतिक्रम विरहित करण्यात आला असून , अंदाजे ३० दुकानांवर जप्तीची कारवाई करून दंड ही वसूल करण्यात आला.
ही मोहीम रामटेक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी , पोलिस स्टेशन रामटेक चे सहाय्यक पुलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे , नगर परिषद चे प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे,
रचना सहाय्यक अनुप तुरकर , बांधकाम अभियंता गणेश अंदुरे व सौरभ कावळे, आरोग्य अधिकारी रोहित भोइर , निरीक्षक महेंद्र जमदाडे , अभियंता अभिषेक अंबागडे, व
इतर अधिकारी, कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता विशाल मराठे, स्थापत्य अभियंता सहाय्यक गौतम दुपारे, आदी कर्मचाऱ्यांनी मिळून संयुक्त मोहीम फते केली.

” नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुख्याधिकारी ला असते,
त्या अनुषंगाने शहरात रहदारीला अडथळा येत होत , नागरिकांच्या तक्रारी येत होत्या , म्हणून ही कारवाई करण्यात आली.
” यापुढेही अतिक्रमण हटविण्याची कारवाई नगरपरिषद तर्फे नियमित राहील त्यामुळे व्यापारी व दुकानदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी स्वतःच आपले दुकाने नेमून दिलेल्या जागेत नियमाप्रमाणे लावावेत अन्यथा पुढे यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येईल.
असे नगर परिषद च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सांगितले.

  1. ब्युरो रिपोर्ट ,
    राकेश मर्जिवे सह शीतल चिंचोलकर नागपूर ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here