Home विदर्भ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

185
0

बेटी बचाव बेटी पढाव कराटे ग्रुप रामटेक तर्फे कराटे ग्रुप विद्यार्थी तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार !

विद्यार्थ्याना कोणतीही मदत ची गरज भासल्यास मी केव्हाही तयार – पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे

अँकर –

बेटी बचाव बेटी पढाव कराटे ग्रुप रामटेक यांच्या वतीने नुकताच कराटे ग्रुप विद्यार्थ्यांचा तसेच कोरोना योध्दंचा सत्कार सोहळा दीप हॉटेल रामटेक येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने झाली . वशू कराटे, थाई बॉक्सिंग, आश्टेडू आखाडा, यामधे विद्यार्थी जिल्हास्तरीय , व राज्य व राष्ट्रीय स्थळापर्यंत गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच दहावी मध्ये 99 टक्के घेऊन तालुक्यातून प्रथम आलेली योगेश्वरी खेडगरकर हीच सत्कार करण्यात आल.
पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी विद्यार्थींना येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले व विद्यार्थ्याना कोणतीही मदत लागल्यास त्यानं वेळोवेळी मदत करीन असे प्रतिपादन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले.

तसेच कोरोना योद्धा म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात काम करणारे पोलिस कर्मचारी, डॉक्टर,
नगर परिषद येथील नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष आलोक मानकर , नगर सेवक संजय बिसमोगरे , लता कामडे, पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर,
नमो नमो मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार , महा. शासन व्यसनमुक्ती पुरस्कृत मेहेर बाबूजी, केळवद चे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, एस.एन. टी.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता टक्कामोरे तसेच समाजसेविका ज्योती कोल्हेपरा, समाज सेवक गोपी कोल्हेपरा, तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राकेश मर्जिवे, जिल्हा कार्यकारी अध्यक्षा सुषमा मर्जिवे, उपाध्यक्षा शीतल चिंचोळकर , यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कोठेकर यांनी तर बेटी बचाव बेटी पढाव कराटे ग्रुप चे कराटे मास्टर अजय खेडकर यांनी आभार मानले.

रिपोर्ट
राकेश मर्जीवे सह शीतल चिंचोलकर नागपूर ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here