एकेकाळी गावखेड्यातल्या भोजनाच्या ताटातील आंबाडी तारांकित हाटेल, रेस्टॉरंट व ज्युस सेटर मधील महत्वाचे पेय ठरत असुन तीची मागणी वाढली आहे. मात्र लागवडी अभावी ती मिळत नसल्याचे सर्वत्र चित्र आहे.
उन्हाळ्यात उन्हाची काहीली कमी करणारा आणि खेड्यामध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबताने सध्या मोठीच भुरळ घातली आहे. त्याला शहरात मोठी मागणी आली असुन सरबत उद्योगात सध्या तो ज्याच्या त्याच्या आवडीचा मुकूटमणी ठरत आहे. वैणगंगेच्या नदीकाठच्या शेत शिवारात आधी याची मोठ्या प्रमाणात आंबाडीची मुक्त वाढ व लागवड होत असे. ह्याचे बोरू(तागं) काढून बैलबारदाना म्हणजे शेती व जनावरांना लागणारे दोरखंड व इतर साहीत्य बनवून पाल्याचा व बिजाचा खाण्यासाठी उपयोग होत असे. बदलत्या शेती मध्ये हे पीक मागे पडले असले तरी सरबत उद्योगास आता नवी उभारी आल्याने पारंपारीक पेय म्हणून आबाडीला मोठी पसंती मिळत आहे. कुही तालुक्यात आंबाडी प्रक्रिया व सरबत उद्योगात मोठा वाव आहे.माञ त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे . वेलतूर परीसरात कुही तालुक्यात धानाची शेती होती . धानाच्या बांधातील पारीवरा तुरी वा तिळ लावल्या जात. सोबत पावसाच्या दिवसांत प्रत्येक शेतकऱ्यांच्या पारीवर आंबाडी ही वनस्पती सहजच उगवते .या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग भाजीमध्येही मोठ्या प्रमाणात केल्या जातो.आयुर्वेदात आंबाडीला मानाचे स्थान आहे.
दिवाळीच्या सुमारास आंबाडी परिपक्व होते.परिपक्व झाल्यानंतर आंबाडीचे फळ लालभळक होते.चविने आंबट असल्याने या फळांचा ग्रामीण भागात भाजीमध्येही उपयोग केला जाते .माञ या आंबाडीचा सर्वात जास्त उपयोग सरबत साठी केला जातो .फळ परिपक्व झाल्यावर आंबाडीच्या झाडाची कापणी करून घरी आणले जाते.नंतर फळावरील लालभडक दिसणारा भाग वेगळा करून वाळवल्या जातो .चांगला वाळल्यानंतर खलबत्यामध्ये बारीक कुट केल्या जातो,नंतर बारिक करण्यात आलेल्या या कुटाचा उन्हाळ्यात सरबतासाठी उपयोग करण्यात येतो.खेड्यापाड्यात या सरबतास मोठी पसंती आहे.शहारात स्थाईक झालेले अणेक व्यक्ती गावी आल्यावर आंबाडीचे हे कुट घेऊन जात असतात.त्याचा सरबतासाठी उपयोग करतात,खेड्यापाड्यात उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस कोणी पाहुणा आला तर हमखास त्याच्या हातात आंबाळीच्या शरबताचा ग्लास ठेवल्या जातो.आंबाडीचे सरबत उन्हाळ्यात अतीषय गुणकारी समजल्या जाते..
व्यवसाईक रूपाने या आंबाडीवर प्रक्रीया करून त्याचे त्याचे सरबत तयारा कराण्यात आले तर या आंबाडीच्या पिकास चालणा मिळू शकते.मागणी वाढल्यास शेतकरी आंबाडीचे पिकही घेऊ शकतात.उद्योगाचे रूप दिल्यास काही तरूणांना रोजगारही मिळू शकतो.यासाठी येखाद्या उद्योजकाणे पुढे येण्याची गरज आहे.एवढेच नाही तर आंबाडीच्या बियामध्ये तेलाची माञा मोठ्या प्रमाणात आहे.या आंबाडीचा उपयोग तेलासाठी होतो . या निमित्ताने दोन उद्योग उभे राहू शकतात …हे विशेष.