Home शैक्षणिक सुरज कोल्हे मानना यश

सुरज कोल्हे मानना यश

345
0

सुरज कोल्हे यांची यशाला गवसणी*
( चार्टर्ड अकाऊंट परीक्षेत यश)

कुही तालुका प्रतिनिधी शरद शहारे

तालुक्यातील खुदावंतपुर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा सुरज सुभाषराव कोल्हे यांनी नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंट या परीक्षेत घवघवीत यश सम्पादन केले असुन सर्वच स्तरावर त्याचे कौतुक होत आहे. सर्वसाधारण कुटुंबातील या युवकाने कठीण अशा ह्या परीक्षेत यशाला गवसणी घाल त एक नवा आदर्श प्रस्थापित केल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते विलास हुडमे यानी व्यक्त करून त्याचे अभिनंदन केले आहे.
सूरज चे वडील यवतमाळ येथील जिल्हा सत्र न्यायालयात बेलीफ या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत . सुभाष कोल्हे यांना तीन मुले असून मोठा मुलगा जलसंपदा विभागात पुण्याला नोकरीवर आहे दुसरा राळेगाव ला नोकरीस आहे. सुरज हा कुटुंबातील सर्वात लहान मुलगा असुन . अत्यंत प्रतिकुल परिस्थिती वर मात करून सुरज ने सीए या परीक्षेत यश सम्पादन केले. सर्वस्तरातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुही तालूका खैरे कुणबी समाजाचे सुनिल जूवार, कैलास हुडमे, प्रबोधनकार आकाश टाले , पर्यावरण वादी रमाकांत शेंडे, आभोरा फाऊंडेशन चे रंजित कुकसे, खैराई चे शरद शहारे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here