राष्ट्रवादीकाँग्रेस ने कुहीत पेटवल्या गोवरी
चुलीवर केला स्वयंपाक
केंद्र सरकारच्या इंधन व गॅस वाढीचा केला निषेध
कुही प्रतिनिधी शरद शहारे.
कुही तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने कुही शहरात इधन व स्वंयपाक गाॅस सिलेंडर च्या दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कुहीतील जुुन्या बसस्थानक परिसरात शेेणाच्या गोवरया पेेेेटवून चुलीवर स्वयंपाक करण्यााल आले.यावेळी सरकार विरोधी घोषणा नी परिसर दुमदुमुन गेलेे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अर्चना हरडे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद हरडे, कुही शहर अध्यक्ष रमेश लांजेवार ,युवा कार्यकर्ते धनराज मोहुर्ले.अक्षय बाभरे परमानंद देशमुख.विठ्ठल सेलोकर इंदुबाई सेलोकार ,मणीशा माहुले,मंगला ओझा, शकील शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
गाॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात कुही तालुक्यात असंतोष असुन कच्च्या तेलाचे जागतिक बाजारात दर कमी झाले असतानाही दिवसा गणीक इंधन वाढ होत आहे. हे थांबवून दर स्थीर ठेवण्याची मागणी करण्यात आली. गॅस वर स्वयंपाक करणे कठीण झाल्याची भावना उपस्थित महीलानी व्यक्त करून सबसीडी कायम ठेवण्याची मागणी केली.