Home सामाजिक पळस फुल्ला तर बरगंडी बहरला

पळस फुल्ला तर बरगंडी बहरला

125
0

*पळस फुलला तर बरगंडी बहरला*

*पुरातन काळापासून पळस व बरगंडीच्या फुलांपासुन तयार केलेल्या पवित्र रंगापासून धुलीवंदनाचा आनंद घेण्याची प्रथा*

*सावनेरः वसंत ऋतू पासुनच हिवाळ्याचा गारवा कमी होउण कोवळ्या उणाला सुरुवात होताच झाडांची पालवी गळू लगते तर सोबतच पळस व बरगंडी सारखे वु्क्ष फुलांनी बहरु लागतात.या फुलांचा खमंग सुगंध ही मनमोहक असतो व जसजशी होळी व धुरंडी जवळ येऊ लागते तसतशी ही वु्क्षे फुलांनी बहरुन येतात*

*होळीचा सण हा पुरातन काळापासून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा असुन होळीच्या पावन अग्नीत ज्या प्रकारे राग,लोभ,व्देष,मत्स आदींची तिलांजली देत सर्व हेवे दावे व वैमनस्य विसरून धुलीवंदनात एक दुसर्यांवर रंग ऊधडून “बुरा न मानो होली है” चा संदेश संपूर्ण विश्वाला या सनाच्या माध्यमातून दीला जातो.पुर्वीच्या काळी धुलीवंदनाचा आनंद लुटन्याकरीता देवी देवता,राजे महाराजेच नव्हे तर सामान्य नागरिक ही या पळस व बरगंडीच्या फुलांचा वापर करत होते.परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसे रसायनयुक्त जिवघेण्या रंगांचा वापर वाढु लागला बाजारात मुबलक प्रमाणात रसायनयुक्त रंग,गुलाल मीळत असल्याने या पळस,बरगंडी सारख्या अनेक फुलांचा रंग स्वताः तयार करणार कोण व त्यामुळे आज या फुलांच्या रंगाचा वापर कमी होत असला तरी काही पर्यावरण प्रेमी मंडळी आजही या प्राकृतिक रंगांचा वापर करुणच धुलीवंदनाचा आस्वाद घेतात…*
*महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने समस्त देशवासियांना होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देत विनंती करण्यात येते की वाढत्या कोरोना संक्रमणात होऊ घातलेल्या होळी व धुलीवंदनाचा आनंद लुटतांना पर्यावरणाचा ह्रास होणार नाही सोबतच होळी धुलीवंदन हे पवीत्र सण असुन आपल्या गैरप्रकारांमुळे इतरांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊणच होळीचा सण साजरा करावा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here