धनगर समाजाच्या घरकुल योजनेस शासनाच्या तिजोरीत ठणठणाट
महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2019 धनगर समाज बांधवा साठी( एन टी सी ) घरकुल योजनेचा अध्यादेश काढला या अध्यादेशाला तब्बल 2 वर्ष झाले मात्र अमलबजावणीस दिरंगाई केल्यामुळे नागपुर जिल्ह्यातील गोरगरीब धनगर बांधव योजनेच्या लाभा पासुन वंचीत राहिले योजने करिता शासना कडुन निधी उपलब्ध झाला नाही एकुणच धनगर समाजाच्या घरकुल योजने साठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट पडल्याचे दिसून येते
नागपुर जिल्ह्या करिता शासनाने एक हजार घरकुलचे मात्र एकालाही या योजनेचा लाभ मिळाला नाही विविध गावातील अर्ज समबंधीत विभागात पडुन राहिले यावर तातडीने कारवाई केली नाही अर्जदारा कडुन त्रुटीची दुरुस्ती करून घेतली नाही वेळकाढू धोरण अवलंबिले आता आर्थिक वर्ष संपले यामुळे धनगर समाज बांधव घरकुल योजने पासून वंचीत राहिले
याला दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे नागपुर जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे उपाध्यक्ष प्रा बाबा टेकाडे प्रदेश चिटणीस युवराज घोडे शरद नांदूरकर महादेवराव आगरकर रामेशवर चाके नारायण बोबडे रमेश बांबल शरद तवले आदींनी केली
या संदर्भात धनगर समाजाचे शिष्टमंडळने नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख जिल्हा ग्रामिण विकास योजनजनेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे आदींना निवेदन दिले
तदवत मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री ओबीसी एन टी सी आणि इतर अल्पसंख्याक मंत्री आदींनाही निवेदन देण्यात आले
यानंतर उपरोक्त मागणी साठी टप्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रा बाबा टेकाडे यांनी दिला