कोच्छी प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना ईश्वर चिठ्ठीद्वारे विकासित भूखंडाचे वाटप
सावनेर ता. कोच्छी गावठाणातील प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जलसंपदा विभागाच्या पुनर्वसन कारवाई अंतर्गत स्थानिक प्रशासनातर्फे विकासित भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आले.
तालुक्यात कन्हान नदीवर कोच्छी बॅरेज प्रकल्प बांधकाम सुरू आहे येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबियांचे जलसंपदा विभागाने पुनर्वसन कारवाई अंतर्गत कोच्छी बावनगाव क्षेत्र नागरी सुविधांची कामे करून विकसित केलेल्या 771 विकसित भूखंडातील 746 लाभार्थी कुटुंबीयांना भूखंड वाटपाची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी पार पडली भूखंड घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबीयांमध्ये मते मतांतरे असल्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक करण्यास प्रशासनाने लाभार्थ्यांचे नावे 746 चिठ्ठ्या तयार करून एका पाच वर्षीय मुलाच्या हस्ते काढुन भूखंड क्रमांकाचे वाटप केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे,उपसभापती प्रकाश पराते, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक गरुड ,पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, जिल्हा परिषद माजी सदस्या ज्योती शिरस्कर, गोविंदा ठाकरे,मधु निमजे,चंदू बनसिंगे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार सतीश मासाळ ,नायब तहसीलदार चैतालीताई दराडे यांनी भूखंड वाटपाची प्रक्रिया पार पडली.
Home Breaking News कोच्छी प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना ईश्वर चिठ्ठीद्वारे विकासित भूखंडाचे वाटप सावनेर ता. कोच्छी गावठाणातील...