शेतकरी संघटनेच्या संयुक्त कार्यकारीणीस सुरुवात
अकोट दि.४(प्रतिनिधी) शेतकरी संघटनेच्या संयुक्त कार्यकारीणीस अकोट येथे दि.३ सप्टेंबर पासुन सुरवात झाली असुन या कार्यकारीणीस राज्यभरातील पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.
शेतकरी संघटना,शेतकरी संघटना महिला आघाडी ,युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष यांची संयुक्त कार्यकारीणी दि. ३,४ व ५ सप्टेंबर रोजी अकोट येथील सातपुडा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. दि ३ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या संयुक्त कार्यकारीणी ची सुरुवात करण्यात आली. या वेळी शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शरद जोशीवरील लघुपटाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. या कार्यकारीणीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील परीस्थीतीचा आढावा प्रत्येक जिल्हाध्यक्ष यांनी या वेळी दिला . या कार्यकारीणीत शेतकऱ्यांनी आपला शेती माल विक्रीसाठी व्यवस्था उभी करावी या साठी विक्री व्यवस्थापनतील तज्ञांनी मार्गदर्शन केले . या कार्यकारीणीस राज्यभरातील तीनशे हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली .
या संयुक्त कार्यकारीणीस माजी आमदार वामनराव चटप,माजी आमदार सरोजताई काशीकर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट,कार्याध्यक्ष ललीत बहाळे ,माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष सतिश दाणी,सिमाताई नरोडे,संजय कोले ,सुधीर बिंदु, शैलाताई देशपांडे,मदन कामडे,वामनराव जाधव ,अनंतराव देशपांडे, डॉ आप्पासाहेब कदम ,शशिकांत भदाणे,रामजीवन बोंदर,सुहासिनी वानखेडे,जोत्सना बहाळे यांच्या सह राज्य भरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यकारीणीत राज्यातील शेती प्रश्नावर चर्चा करुन शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष व या बैठकीचे संयोजक ललीत बहाळे यांनी सांगितले .कार्यक्रमाचे संचालन सतीश बाबा देशमुख यांनी केले.
या कार्यकारीणीच्या यशस्वीते साठी माहिती लक्ष्मीकांत कौठकर माहिती व तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख जसराज भैया बाहाळे ,सतीश सरोदे ,आकाश देऊळकर , अजित कळसकर , दिनेश गिर्हे, निलेश नेमाडे,दिनेश देऊळकर , जाफर खां ,गोपाल निमकर्डे ,मंगेश रेळे, नीलिमा देशमुख ,उज्वला पांडे ,अंकिता धुळे, प्रिया देऊळकर, सुषमा नेमाडे, ज्योती डांगे,किरण कौठकर , निकिता धुळे, छाया भारसाकळे, अनुराधा खिरोडकार, संगीता कोडापे, संतोषी फाटे, मंजु नेमाडे अकोला जिल्हा शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी परीश्रम घेत आहेत .