सावनेरात तहसीलदारपदी प्रताप वाघमारे रूजु
कामकाज स्वीकारताना अनेकांनी केले स्वागत त्सेेे
सावनेर ता. सावनेरचे तहसीलदार सतीश मासाळ यांची हिंगणघाट येथे बदली झाल्याने तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तर अगोदरच येथील कार्यालयात नायब तहसीलदार यांच्या जागा रिक्त असल्याने कामकाजाचाही प्रश्न निर्माण झाला होता.मात्र अखेर प्रशासकीय कामकाजात आपल्या कार्यशैलीतून ठसा उमटविण्यात प्रचलित असलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रताप वाघमारे यांची नियुक्ती सावनेरात करण्यात आली.
तहसीलदार वाघमारे सावनेर तहसील कार्यालयात रुजू होऊन त्यांनी आपल्या कामाची जबाबदारी सांभाळली आहे कामकाज स्वीकारताना तहसील कार्यालयातील कर्मचारी व बऱ्याच मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे तहसीलदार कोण येणार या प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे.
सावनेर: तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करताना पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी