Home Breaking News सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर.

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर.

471
0

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा
सावनेर.
येथील राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव धुंदाड, शाखा व्यावस्थापक युवराज हातझाडे, उपशाखा व्यवस्थापक शैलेश तोताडे, विकास अधिकारी अतुल कुलकर्णी व भुपेश वंजारी लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक निखाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली तर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षेत 85% पेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ट कार्य केलेल्या अभिकर्ता यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित अभिकर्ता यांना प्रमुख पाहुण्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. देशभरात कोरोना या साथीच्या रोगाने मृत्यु झालेल्या अभिकर्ता, व सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंच संचालन मनिषा नान्हे व धवल डुंमरे यांनी तर आभार प्रदर्शन रितेश सुर्यवंशी यांनी केले
एल आय सी निगम गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अभिकर्ता यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here