- शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर
सावनेर ता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी प्रशासनाला दिले स्थानिक अल्पसंख्यांक समाजा कडून प्राप्त झालेल्या तक्रारी बाबत चर्चा निराकरण व उपाय योजना याबाबतच्या तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते
यावेळी बैठकीला उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे,गटविकास अधिकारी दिपक गरूड, नगरसेवक शफिक सय्यद माजी जिल्हा परिषद सदस्य वैद्यनाथ डोंगरे,माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम कापसे, शिक्षक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार अंजनकर, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव राजीव वानखडे ,लक्ष्मीकांत पोटोडे, सुधीर कोल्हे, भिमराव झाडे, राज पाटील ,उमेश धोटे,बनसोड,कुमरे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बनसोड व कुमरे यांनी आपल्या समाजातील काही समस्या यावेळी उपस्थित केल्याने या समस्या सोडविण्यासाठी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केलेत.