Home Breaking News
190
0

शेतकरी संघटनेने विज तोडणी थांबवली

आकोट तालुक्यात शेतीपंपांची विज खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला. यावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे यांचे नेत्रुत्वात आकोट येथील कार्यकारि अभियंत्याची भेट घेऊन विज बिल दुरूस्तीची मागणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली, यावर साफ दुर्लक्ष करीत शेतीची विज रोहित्रांची विज खंडित करुन वीजबील वसुली सुरू केली. यंदा अति पावसामुळेे नापिकीचे सावट असताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे त्यावर महावितरण पावसाळ्यातही विज वापरली असे गृहीत धरून सक्तीची वसुली करीत आहे.
आज सकाळी पणज येथे शेतकरी संघटनेचे नेते सतीषबाबा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पणज,आकोली, रूईखेड, बोचरा, वस्तापुर, जनुना, राजुरा येथील शेतकर्यांची सभा झाली, सभेला सर्वश्री ललितदादा बहाळे, सतीष देशमुख, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, गजानन पाटील दुधाट यांनी मार्गदर्शन केले सभेचे रुपांतर मोर्चात होवुन हा तिनशे ते चारशे शेतकर्यांचा मोर्चा कार्यकारि अभियंता आकोट यांचे कडे जात असताना डी वाय एस पी कु.रितु खोकर ,शहर पि आय, अहिरे ग्रामीणचे नितीन देशमुख यांनी कायदा सुवस्थेचे कारण देत अडविला व ललितदादा बहाळे यांनी सर्वाना शिवाजी हायस्कूल मध्ये बसवून, कार्यकारि अभियंता आकोट, श्री श्रीकांत देशपांडे एस डी ओ आकोट यांचेशी चर्चा करून विज जोडणीचे आदेश तात्काळ काढण्यास भाग पाडले यावेळी आमचे वीजबील दुरूस्त करुन द्या व नंतर ते आम्ही भरु ही भुमिका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतली.
या वेळी, निलेश नेमाडे, अजीत कळसकर, सुभाष सरोदे, अनोख रहाणे, सतीष सरोदे, पंकज मानकर,आकाश देऊळकर, शशिकांतजी गयधर,अनिल रोकडे, प्रदीप ठाकुर, विलास शेंडे,ओम शेंडे, विकास देशमुख, अमोल बदरखे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here