दिलीप घोरमारे मुख्य सम्पादक
वाडी:स्थानिक श्रीमती विमलताई तिडके विद्यालयाचा इयत्ता 10 वी शिकत असलेला प्रतिक मेश्राम याचा राहत्या घरी विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक प्रतिक संतोष मेश्राम वय 16 वर्ष रा मंगलधाम सोसायटी वाडी हा स्थानिक शाळेत आठव्या वर्गापासून शिकत होता दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन लागल्याने तो आपल्या परिवारासह अमरावती येथे राहायला गेला होता,या शैक्षणिक सत्रात मृतक 10 व्या वर्गात असल्याने नियमित शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्याचे मामा कैलास गुरदे यांचेकडे राहायला आला होता.प्रतिक नियमित वेळेप्रमाणे दुपारी 3 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आला,कपडे बदलून जेवण केले.त्याच्या मामाचा छोटा मुलगा व शेजारची छोटी मुलगी लपाछपीचा खाली खेळ खेळत असताना प्रतिक घराच्या छतावर लपायला गेला असतांना घरावरील 11 हजार व्होल्ट असलेल्या विद्युत तारेला मृतकाचा स्पर्श झाल्याने तार हलायला लागली असता खाली खेळत असलेल्या मुलांनी प्रतिकच्या मामीला सांगितले असता दादाला आवाज दे असे सांगितल्यावर मुलांनी आवाज दिला परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मामी वर गेली असता प्रतिक मृतावस्थेत दिसताच घटनेची माहिती आरडाओरडा करून परिसरात दिली.घटनास्थळी वाडी पोलीस व वाडी न प अग्निशामक विभागाचे कर्मचारी हजर होते. मृतकास उत्तरीय तपासणी साठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. वाडी पोलीस ठाण्याचे पी एस आय मुंडे, पो. हे. कॉन्स्टेबल दिनेश तंदुळकर, हेडकॉन्स्टेबल शुक्ला, पंकज व गजेंद्र घटना स्थळी उपस्थित होते पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे
विलास माडेकर वाडी