अवकाळी पाऊस व गारपिटीने वलनी,पोटा,दहेगाव शिवारातील पिके जमिनदस्त
नामदार सुनिल केदार शेतकऱ्यांच्या बांधावर
सावनेर ता. तालुक्यातील वलनी,रोहना,पोटा,दहेगाव आदी परिसरातील शिवारात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कापूस,तुर,गहू, हरभरा, टमाटर आदी उभ्यापिकांसह फुलशेती व भाजीपाला पिके जमिनदस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे यांनी अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली व शेतकऱ्यांना धीर दिला गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्याचे पशुसंवर्धन दूध विकास व्यवसाय क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांना मिळाल्याने मंत्रीमहोदयांनीही गुरुवारी दुपारी एक वाजता जळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पिक नुकसानीचे निरीक्षण केले या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना धीर देऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकिय यंत्रणेला दिल्यात
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे,उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार प्रतापराव वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे,गटविकास अधिकारी दीपक गरुड,सभापती अरुणाताई शिंदे,पंचायत समिती सदस्य पुष्पाताई करडभाजने,महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सावनेर: दहेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे निरीक्षण करताना नामदार सुनील केदार,जी.प.सदस्य प्रकाश खापरे व इतर