महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा (ग्रामिण)आणि सावनेर तालुका धनगर समाज यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती पंचायत समिती सावनेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा (ग्रामिण)चे अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून उपविभाग अभियंता नरेंद्र निमजे टेम्भुरडोह ग्रामपंचायत माजी सरपंच विनोद नस्कोल आदी होते
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेची पूजाअर्चा करून पुष्पमाला अर्पण केली तथा दीपप्रज्वलन केले यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे नागपूर जिल्हा (ग्रामिण )अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले यातील अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आजही सामाजिक कार्या साठी सर्वश्रेष्ठ आहे त्यांची आपल्या राज्यातील प्रशासनावर पकड होती 28 वर्ष राज्यकारभार चालविला शत्रू देखील देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगतात
ते पुढे म्हणाले तद्वकालीन लोकहिताच्या कामामुळे भारतभर त्यांचे नाव अजरामर आहे याचा आजच्या नेत्यानी आदर्श अंगिकरने ही काळाची नितांत गरज आहे
यावेळी उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे यांनीही आपले विचार मांडले
प्रास्ताविक प्रा विजय टेकाडे यांनी केले संचालन शरद नांदूरकर यांनी केले प्रफुल वडे यांनी आभार मानले
कार्यक्रमाला राजू भक्ते संजय डाखोळे हिरालाल आगरकर विनोद नस्कोल श्रीकांत मेकलोर युवराज भुजाडे रामेश्वर चाके विठ्ठल खाटीक रमेश बांबल महादेव आगरकर नारायण बोबडे रामभाऊ तवले विवेक तवले करनुजी गावंडे आदी सह सावनेर तालुक्यातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते
पंचायत समिती सभागृह सावनेर येथे