नागपूर
सावनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नांदा छत्रापूर मार्गावरील बावनमारी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात स्कार्पिओ चालकाने वाहन टाकण्याचे धाडस केल्याने मोठी दुर्घटना घडली.या घटनेत चालकाने स्वतःसह प्रवाशांचाही जीव गमावल्याची मोठी दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
रोशनी नरेंद्र चौकीकर,वय 32, दर्श नरेंद्र चौकीकर वय 10 वर्ष,लीलाधर डिवरे वाहन चालक वय 38 वर्ष तिन्ही राहणार झिंगाबाई टाकळी नागपूर तसेच मधुकर पाटील वय 65 वर्ष,निर्मला मधुकर पाटील वय 60 वर्ष दोन्ही राहणार दातोरा तह.मुलताई जिल्हा बैतूल,मध्य प्रदेश व निमु आडनेरे 45 वर्ष जामगाव तहसील मुलताई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश असी मृतकांची नावे आहेत
AVB माझा प्रतिनिधि दिलीप घोरमारे नागपूर