सावनेरच्या गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचा सत्याग्रह
सावनेर ता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मंगळवारी( ता. 26 ला) सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर होतील तेव्हा सत्याग्रह करण्यात येईल असे काँग्रेस तर्फे जाहीर करण्यात आले होते.यामुळे सावनेर तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्थानिक गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह करून केंद्रातील भाजप शासनाचा निषेध केला.
नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी पुन्हा प्राचारण केले आहे या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सर्व प्रदेश शाखांना पत्राद्वारे आदेश दिला होता या आदेशा नुसार तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सावनेर शहरात येथील गांधी पुतळ्या समोर मंगळवारी सकाळी 11 वाजता पासून धरणे देऊन सत्याग्रह केला यावेळी सत्याग्रहकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करून निषेध केला