Home विदर्भ अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्याना वीज बिलाचा भरमार.

अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्याना वीज बिलाचा भरमार.

53
0

*अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्याना वीज बिलाचा भरमार……*

*अवाढव्य वीज बिल भरायचा कसा शेतकऱ्याना पडला प्रश्न??…….*

*मागील मीटर रिडिंग नुसार पाठवले हजारोंचे वीज बिल……*

*महावितरणाचा भोंगळ कारभार……*

*शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबाला आणि पाळीव प्राण्यांच्या सहित आंदोलन छेडण्याचा इशारा….*

गोंदिया :- संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलाचा प्रश्न आपण नेहमीच बघतो मात्र गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील खोळगड या गावात शेतकऱ्याना मीटर रिडिंग नुसार वीज बिल न पाठवता भरमसाठ वीज बिल पाठविल्याने एवढा मोठा वीज बिल भरावा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्याना करावा लागत आहे….दरम्यान आधीच पिकातुन हाती काही न लागल्याने विज बिलासाठी जीव द्यायचा काय असा सवाल शेतकरी विचारताय……
गोंदिया जिल्ह्यातील वीज बिलाचा प्रश्न आपण नेहमीच ऐकतो मात्र खोलगड येथील शेतकऱ्याना 10 हजारापासून 40 हजारा पर्यंत वीज बिल पाठविल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्याना हैराण केले जात असून भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वीज बिल पाठविल्याने शेतकऱ्यानी आज चक्क कार्यकारी अभियंता विद्युत विभागाचे कार्यालय गाठले वारंवार पाठपुरावा करून देखील अनेक शेतकऱ्याचे वीज मीटर दुरुस्त किव्हा रिडिंग दिसत नसल्याचा कारणावरून उन्हाळ्यात येणारे वीज बिलाचा आधार घेऊन घेऊन महावितरण विभागाने ग्राहकांना पाठविल्याने शेतकऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत असून गरीब शेतकरी अडचणीत आला आहे….
वीज बिलाच्या विषयी वारंवार पाठपुरावा करून देखील शेतकऱ्याना त्रास देणे सुरू राहिल्यास खोळगाड वासियानी शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबाला आणि पाळीव प्राण्यांच्या सहित आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे….
दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवसात त्यांच्या वीज बीलाच्या समस्येचे निराकरण नाही तर आंदोलनाच्या इशारा दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महावितरण विभाग कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल…….
या वेळी राजेश चांदेवर माजी जिल्हा परिषद सदस्य, पुष्पाकला मोहरे पीडित महिला शेतकरी, संतोष रहांगडाले शेतकरी आणि पीडित शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here