Home Breaking News शालेय क्रीडा स्पर्धा तात्काळ सुरु करणारच – क्रीडामंत्री गिरीश महाजन

शालेय क्रीडा स्पर्धा तात्काळ सुरु करणारच – क्रीडामंत्री गिरीश महाजन

77
0

शालेय क्रीडा स्पर्धा तात्काळ सुरु करणारच – क्रीडामंत्री गिरीश महाजन

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघास दिले आश्वासन

काटोल/नागपूर : कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडू हीत लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरुच करणार व या बाबत याच आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते, अशी माहिती राज्य सहसचिव प्रितम टेकाडे व सुधीर बुटे यांनी दिली.

मध्यंतरीच्या काळात रखडलेले खातेवाटप नंतर विधीमंडळाचे अधिवेशन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणेस उशीर होत होता. स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडिया मध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची ॲडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून उशीरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे कळते. त्या धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती डॉ प्रदिप तळवलकर, राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, डॉ रणजित पाटील, प्रा हरिश शेळके, प्रा ईकबाल मिर्झा, गिरीश पाटील,डॉ.क्षितीज भालेराव, डॉ आसिफ खान, विलास पाटील, प्रविण पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींनी मंत्री महोदयांना केली. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मंत्री महोदयांच्या कार्यालयाशी संपर्क करून निवेदन सादर केले आहे .

——————————————–
चौकट

राज्य शालेय क्रीडा स्पर्धा बंद असल्याने शिक्षक, पालक व खेळाडू चिंतीत आहेत. वर्षानुवर्षाची मेहनत वाया जाणार, ग्रेस गुण, अकरावी प्रवेश कोटा, ५%आरक्षणासारख्या सवलतीपासून खेळाडू मुकणार आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु व्हाव्यात अन्यथा खेळाडूंचे करीअर खराब होईल.

सुधीर बुटे
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारार्थी तथा, पदाधिकारी नागपूर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ
————————————–फोटो कॅपशन : क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांना शालेय स्पर्धा सुरू करण्याबाबत निवेदन देताना डॉ तळवळकर, राजेश जाधव इतर संघटनेचे पदाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here