सावनेर:
“सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमनबाई परतल्या घरी”
तब्बल दोन महिन्यानंतर नातेवाईक आले घेण्यासाठी…..
हितेशदादा बनसोड यांच्या प्रयत्नांना यश…
नाव : सुमनबाई कतिया,वय 45
राहणार पिपरिया जिल्हा हौशंगाबाद मध्यप्रदेश
दोन महिन्यापूर्वी नातेवाईकांच्या गावाला जाण्यासाठी निघालेली, सुमनबाई चुकीच्या ट्रेनमध्ये बसून तिची वाट चुकली आणि ते नागपूर येथे पोहोचली, तिला बोलता येत नसल्याने ती पत्ताही सांगत नव्हती, जिथे मिळेल तिथे राहायची, रात्री बे रात्री मिळालेल्या मंदिरात झोपायची, काल रस्त्याने जात असताना निखिल आष्टणकर यांना एक महिला
पायदळ जाताना दिसली, त्यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांना सदर महिलेची माहिती दिली, हितेश बनसोड यांनी घटनास्थळ गाठून, सदर महिलेची चौकशी केली, ती मुकी असल्याचे आढळून आले, लगेच तिला स्वतःच्या घरी घेऊन आले, दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया वरून प्रचार सुरू केला,आणि तो व्हिडिओ थेट तिच्या गावात तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला, मुलांनी पतीने तिला ओळखले, आणि त्यांचे अश्रू अनावर झाले, त्यांनी लगेच सावनेर गाठले, आणि कायदेशीर प्रक्रिया करून तिला घेऊन गेलेत… पोलीस स्टेशन पिपरिया पोलीस स्टेशन इथे तिची मिसिंग दाखल आहे….
नातेवाईक यांनी तिच्या बरा शोध घेतला पण तिच्या कुठे पत्ता लागत नसल्याने शेवटी त्यांच्या हाती निराशाच येत होती….
” निराधारांना थोडासा आनंद देता यावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावलेल्या व्यक्तीची भेट घडून आली, हे आम्ही करीत असलेल्या कामाचे फलित आहे यापुढेही असा उपक्रम यापुढेही सुरू राहील….
होशंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ता विनोद पटेल यांनी हितेश बनसोड यांच्या कार्याची स्तुती केली
त्या परिवाराच्या आर्थिक परिस्थिती पाहता
सावनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मारुती मूळक यांनी दोन हजार रुपये आर्थिक मदत त्या परिवाराला केली केली