तालुका प्रतिनिधी सावनेर :- अलीकडे शहरातील धनाढ्य लोकांनी शहराबाहेर गावपातळीवर विविध मौजातील कृषक जमिनी मोठया प्रमाणात खरेदी करून मोठमोठे फार्म हाऊस,हॉटेल, रिसॉर्ट, वॉटर पार्क, पिकनिक स्पॉटची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये
‘नाईट पार्टी कल्चर’च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.
मौजा टाकळी (भं) शिवारात रविवार (दि.३१डिसेंबर) मध्यरात्री उशिरापर्यंत सुरु असलेली हुक्का पार्टी ग्रामीण पोलिसांनी उधळली. मोठ्या संख्येने लोक एका फार्महाऊसमध्ये एकत्र येत हुक्क्याचा धूर सोडत धिंगाणा घालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत धाड टाकली.
तालुक्यात विविध गावांमध्ये अलिकडे ‘नाईट पार्टी कल्चर’च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, वॉटर पार्क, पिकनिक स्पॉट,फार्म हाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्टी कल्चरमुळे कोरोनाच्या प्रादूर्भावाला हातभार गावपातळीवर लागण्यास मदत होत असल्याचेही बोलले जात आहे. सरकारी यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष पुरवून कारवाईची मागणी होत होती.
रविवार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रंगलेल्या हुक्का पार्टीची ‘दुर्गंधी’ थेट ग्रामिण पोलीसांन पर्यंत येऊन पोहचली.
टाकळी (भ) विराट फार्म नावाच्या रेस्टॉरंट व फार्महाऊसवर रात्री ३ वाजताच्या सुमारास छापा मारला. आरोपी फार्महाऊस मालक अजय तिवारी यांच्यासह पियुष वाकोडीकर,शुभम आमदारे सर्व राहणार नागपूर याचा समावेश आहे. तंबाखुजन्य पदार्थांचा साठा व हुक्का पिण्याचे साहित्य आढळून आले असून सुमारे पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. फार्महाऊसमध्ये हुक्क्यासारख्या प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या तीन आरोपीन विरुध्द सावनेर पोलीस ठाण्यात कलम १८८, भादवि सह कलम ४.२० कोप्ता कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे,सहा. पो.नि.शरद भस्मे, माणिक शेरे, राजेंद्र यादव,अशोक निस्ताने, अंकुश मुळे यांनी केली.