सावनेर तहशिल हद्दीतील आज रोजी खापा पोलीस स्टेशन हद्दीतील खूबाळा रोडवर एक पिकअप वाहन क्रमांक एम एच 31 एफ सी 7173 मध्ये वाहन चालक हा जनावरे कोंबून नेत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने, सदर ठिकाणी पोलीस पोहोचण्यापूर्वी वाहन चालक हा वाहन जंगल परिसरामध्ये थांबवून,पळून गेला सदर वाहनांमध्ये एकूण 07 गोवंश कोंबून निर्दयतेने भरून जखमी अवस्थेत मिळून आले. सातही गोवंशला गोशाळेमध्ये देखरेखीसाठी दाखल करण्यात आले असून वाहन चालकाविरुद्ध खापा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश नांदुरकर हे करीत आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री संदीप पखाले सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग,श्री अनिल मस्के सर, यांचे मार्गदर्शनात करण्यात आली आहे.
दिलीप घोरमारे नागपुर