राहुल सावजी :- तालुक्यातील टाकळी (भं) येथे भणसाळी क्रीडा व संस्कृतीक मंडळ टाकळी भं तर्फे आयोजित जिल्हास्तरीय दोनदिवसीय कबड्डी स्पर्धा येथील भणसाळी बुनियादी विद्यामंदीर शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. सामन्याचा पहिल्या दिवशी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करून सामन्याला सुरुवात आली.
क्रीडा मंडळ तर्फे भरविण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दोन्हीं मैदाने प्रेक्षकांनी भरगच्च भरली होती.अंतिम सामन्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस २१ हजार रुपये व विजयचिन्ह जय बजरंग क्रीडा मंडळ आजनी येथील संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये व विजयचिन्ह भणसाळी क्रीडा मंडळ टाकळी आणि तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये व विजयचिन्ह एकता क्रीडा मंडळ सवंद्री यांनी पटकावले.
एकूण २९ संघांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट खेळाडू भुषण मुलकर,उत्कृष्ट चढाई ओम पिंपळे,उत्कृष्ट रक्षक विशाल पंचेश्वर यांना देखील पारितोषिक देण्यात आले.
भणसाळी क्रीडा व संस्कृतीक मंडळ टाकळी भं तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत जय बजरंग संघाने लढतीत आधीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले होते.
यावेळी सरपंच, उपसरपंच, क्रीडा शिक्षक,पोलिस पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह असंख्य गावकरी उपस्थित होते.