सोळा तास नंतर सापडला मृत्यूदेह
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर
राळेगाव तालुक्यातील सोनुर्ली येथील संजय बोरेकार,यांचं मुलगा रुद्र संजय बोरकर वय 6 वर्ष दि 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजल्यापासून शेतातून कुठेतरी बेपत्ता झाला असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली.मात्र मुलाचा पत्ता लागलला नाही. शोध घेत असताना संजय बोरकर यांच्या शेताला लागूनच त्रंबक खैरे यांचे शेत आहे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये मुलगा पडल्याचा संशय व्यक्त केल्या जात होता.सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने विहिरी गच्च भरलेल्या आहे त्या विहिरीमध्ये गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्यात रुद्र नसल्याचे बोलले जात होते मात्र रुद्र यांचे वडिलांना याच विहिरी रुद्र पडला असल्याचा संशय त्यांना होता संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला मात्र रुद्र कुठेही आढळून आला नसल्याने रुद्र चे वडील संजय यांनी वडकी पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही शोध घेण्यास सुरुवात केली रात्रभर शोध घेण्यात आला मात्र कुठेही रुद्र आढळला नसल्याने पुन्हा एकदा रुद्र यांचे वडिलांनी त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या खैरे यांच्या शेतातील विहिरीत पाहण्यास सांगितले असता आज सोमवारला सकाळी वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी यवतमाळ येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले व रेस्क्यू टीमने विहिरीमध्ये शोधा शोध सुरू केली अखेर खैरे यांच्या विहिरीतच रुद्र चा मृत्यूदेह आढळून आला. रेस्कु टीम च्या माध्यमातून मृत्यू देह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी वडकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे हे करीत आहे