राहुल सावजी :- सावनेर – कळमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी दि. २५ ऑक्टोबर शुक्रवार ला दुपारी २ वाजताच्या सुमारास आम आदमी पार्टीचे पंकज घाटोडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारकडून रॅली काढत मोठया प्रमाणात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनामुळे सावनेर शहरात नव्या पार्टीचा उगम झाल्याचे दुश्य मोठया प्रमाणात दिसून आले.
या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष तथा पार्टीच्या पदधिकारी व सदस्यांचा समावेश होता. गडकरी चॊकातील कै. राम गणेश गडकरी
यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून रैलीची सुरवात करण्यात आली. गडकरी चौक ते बसस्टॉप रैली काढत शक्तीप्रदर्शन करत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले.
यावेळी संजय टेभेकर, संजय राऊत, गजू चौधरी जामुवंत वारकरी, अतुल निकोसे, छत्रपती लांबट, अन्सार शेख अरुण गुरव, शुभम साबळे, मदन मोरे, महेश बुधोलीया, मोरेश्वर वाघमारे, प्रकाश ढोबळे, राजकुमार बोरकर, प्रमोद तिखे, बंडू चौरागडे, अनामीका डिमोले, रूही शेख, वैशाली जवजाळ, लीला सूर्यवंशी, रजनी सलोनी, पद्मा डहाट, प्रमिला टेंभेकर, मंदा सनेसर, सुमन सनेसर, लता वानखेडे, दर्शना वाघमारे, आशा वाघमारे, शुभम बागडे, दिनेश मछले, कुणाल कोलते, नाना बांगडकर, गेलाल तागडे, विजय पाटील, सुरेश चटप, बन्सी कोठेकर, रवी वानखेडे, रोहित वाघमारे, दिनेश सनेसर, कृष्णा सनेसर, दशरथ वानखेडे, विशाल लोखंडे, सुरेश बांबल, कमलेश पटेल, कमलाकर सांभारे, योगेश राऊत, दीपिका चाफेकर, गौरव घोळसे, रितेश घोळसे आदी उपस्थित होते.