गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
पंचायत समिती येथे दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचे सहभागातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून पंचायत समिती येथे आयोजित रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले आणि रक्तदान केले.याप्रसंगी प्रभाकर भोसले सभापती,श्रावण दादा भिंगारे उपसभापती,महेंद्रजी डोंगरे,पिंकी ताई कौरती,देवानंद कोहळे जिल्हा परिषद सदस्य,मालती ताई वसु,वंदनाताई बोदाने, जयश्रीताई वाळके पंचायत समिती सदस्य यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन स्वतः रक्तदान करून इतरही लोकांना प्रोत्साहित केले.सदर रक्तदान शिबिर एचडीएफसी बँकेचे मनीष अडागळे व आयुष रक्तपेढी संचालक संजय बारगावले नागपूर यांच्या वतीने पंचायत समितीच्या कळमेश्वर च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरादरम्यान जवळपास ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक जंगले,नंदकिशोर खंडाळ,कृषी विस्तार अधिकारी,बबन शृंगारे विस्तार अधिकारी पंचायत,दीपा कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी,विशाल गौर गटशिक्षणाधिकारी व आदी अधिकारी कर्मचारी यांचे विशेष प्रयत्नाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आजकाल आरोग्याच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की त्याचे निदान सुद्धा लवकर लागत नाही.शरीरासंबंधी होणाऱ्या आजारात रक्ता संबंधीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे रक्ताची समस्या निर्माण होत आहे. या सामाजिक दृष्टिकोनातून पंचायत समिती कळमेश्वर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे – श्रीमती अंशुजा गराटे (गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर)