Home सामाजिक रामगिरी गावात बिरसा मुंडा जयंती साजरी

रामगिरी गावात बिरसा मुंडा जयंती साजरी

37
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील रामगिरी गावात बिरसा मुंडा मंडळाच्या वतीने बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन दि.१० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते.या प्रसंगी गोंडी पूजन करून गावातून रॅली काढण्यात आली.तर समाजातील नवयुकांनी गोंडी नृत्य सादर केले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिष देशमुख हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी समाजभूषण दलितमित्र प्रकाश गेडाम व प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य दिनेश शेराम,महेंद्र उईके,आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद मसराम, हरीष कंगाली,मनोहर कुंभारे,सरपंच शारदा बरखाडे,प्रशांत कुमरे,प्रशांत मडावी,जयश्री धुर्वे,रामराव मोवाडे,श्रीकांत येनुरकर,संदीप उपाध्ये,मनोज मांडवगडे,शंकर वाढिवे,आकाश मडावी,राहुल लांडे,वैभव टेकाडे,राहुल अंजनकर,चंदू चांभारे,अमोल भुरे,बेबी धुर्वे,मंगेश कोठाळे,प्रवीण कौरती,अजय भिमटे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मडावी,प्रद्युम्न सिरसाम,नीलेश सलाम, सौरभ धुर्वे,लहू उईके,देवराव धुर्वे,गणेश कुंभरे,मधुकर सलाम,प्रकाश उईके,प्रवीण कौरती,रवींद्र उईके,गजानन सिरसाम व गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here