नागपुर
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, (NHAI) प्रादेशिक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिव्हिल लाईन्स,नागपुर येथे प्रमुख विषयांच्या प्रलंबित कामांसाठी ची बैठक आयोजित केली गेली.यावेळी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागपूर कॅम्प ऑफिस, नागपूरचे प्रादेशिक संचालक यांना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी टोल नाका तात्काळ हटविण्यात यावे या विषयावर एक पत्र दिले.
यावेळी बैठकीला आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यासोबत भाजपाचे डॉ राजीव पोतदार, श्री मनोहर कुंभारे, श्री ठेंग साहेब (तांत्रिक सल्लागार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण), श्री सिन्हा साहेब (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण), मुख्य कार्यपालन अधिकारी सावनेर,मुख्य कार्यपालन अधिकारी कळमेश्वर, श्री चंद्रशेखर गिरी,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग २ नागपुर,श्री सुनिल दमाहे,सहा. अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर,श्री रूपेश बोदडे,सहा.अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर,श्री श्रीवास्तव, रेल्वे सहा.अभियंता, नागपुर विभाग,मंदार मंगळे,महेश चकोले,पियुष बोर्डे,अनंता पडाळ,पिंटू सातपुते,राजेंद्र जयस्वाल,धनराज देवके,अभिषेक धोटे आदी उपस्थित होते.