Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

3
0

नागपूर, दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/ या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आए. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सहज सुलभ करण्यात आले आहे.या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा),आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो,पोलिस संशोधन केंद्र,(सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे,महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलिस, एनजेडीजी राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड,देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल,ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here