Home Breaking News सावनेर शहराचा सुधारित विकास आराखडा मंजुरीचा मार्ग मोकळा होणार..! – आमदार डॉ...

सावनेर शहराचा सुधारित विकास आराखडा मंजुरीचा मार्ग मोकळा होणार..! – आमदार डॉ आशिष देशमुख

51
0

सावनेर नगरपालिकेच्या सुधारीत विकास आराखडा (डी.पी. प्लान) व सावनेर सुधारीत पाणी पुरवठा योजना या दोन महत्वाच्या विषयावर आज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांच्या सोबत सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशीषराव देशमुख व डॉ राजीव पोतदार यांच्या पुढाकाराने विधान भवनात बैठकी पार पडल्या.सावनेर शहराचा सुधारीत विकास आराखडा मागील २० वर्षापासून शहराचा ८० टक्के भाग कोळश्याने व्याप्त असल्यामुळे भारत सरकारच्या कोळसा विभागाने ना-हरकत न दिल्यामुळे अडलेला होता. मागील २० वर्षापासून पालिक प्रचंड पत्रव्यवहार व बैठका घेत होते परंतु तोडगा निघत नव्हता. परंतु, आजची बैठक सकारात्मक होऊन महाराष्ट्र शासन आपल्या स्तरावर सावनेर विकास आराखडा तयार करण्याकरिता कार्यवाहीला सुरुवात करेल व समोरील सहा महिन्यात कार्यवाही सुरू करेल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे सावनेर शहराची ९५ कोटीची सुधारीत पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यतेकरिता सुद्धा कारवाई सुरु करा, असे आदेश मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या दमदार कामगिरीला सुरुवात झाली असून सावनेर शहराचा विकास आरखड्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीमध्ये पालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड.अर‌विंद लोधी, रामराव मोवाडे,राजू घुगल,मंदार मंगळे, तुषार उमाटे,आशीष मानकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुख्यअधिकारी किरण बगडे,धनराज देवके, प्रफुल मोहटे, पियुश बुरडे, महेश चकोले, पिन्टू सातपूते, मोहपा, कळमेखर व खापा पालिकेचे पदाधिकारी सुद्धा आपल्या पालिकेच्या समस्या घेऊन हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here