गिरीश आंदे (तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
तालुक्यातील ग्रा.पं.तेलकामठी येथे जल जीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता विषयक दि.१८ ते १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळेमध्ये पाच पंचतत्वांपैकी जल तत्वावर अतिक्षय महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सद्भावना ग्रामिण विकास संस्था,वर्धा यांच्या मार्फत करणात आले.कार्यशाळेच्या च्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कळमेश्वर सदस्या मा.श्रीमती.मालतीताई वसु व मा.श्रीमती प्रेमाताई डफरे सरपंच ग्रा.पं.तेलकामठी या होते.
कार्यशाळेमध्ये मुख्य प्रशिक्षक श्री सुनिल गजभिये व श्री.अंकुश बुरांगे यांचे मौलाचे मार्गदर्शन मिळाले.या प्रसंगी पाणी पट्टीचे महत्त्व,जल जीवन मिशन योजना, पेयजल संहीता अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण कार्यशाळेत ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक पा.पु. समिती मधिल महिला व जलसुरक्षक सहभागी होते.