नागपूर, दि.२० डिसेंबर कळमना बाजारात संत्रा व मोसंबीवर प्रति टनामागे १०० किलो काट जो शेतकऱ्यांकडून घेतल्या जात होता. तो १०० किलो काट रद्द करण्यात आला. याकरिता आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकाराने यश आले आहे.
कळमना बाजार समितीत हंगामात २० टन संत्रा मोसंबीची खरेदी होते. या शेतकऱ्यांकडून प्रति टनामागे १०० किलो याप्रमाणे काट आकारला जातो. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या संत्रा, मोसंबी फळामध्ये काही लहान आकाराची फळे असल्याचे कारण देत हा काट आकारल्या जातो.
गेल्या अनेक वर्षांपासून ही लुटीची परंपरा कायम आहे. ही पद्धत बंद व्हावी याकरीता यापूर्वी देखील सातत्याने मागणी करण्यात आली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. पण आज आमदार डॉ.आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात हा १०० किलो काट रद्दचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आमदार देशमुख यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात आला.कृषी उत्पन्न बाजार समितीत जे संत्रा,मोसंबी उत्पादक शेतकरी आपला माल देतात, त्यांना १०० किलोचा काट प्रत्येक टनामागे तेथील व्यापारी कापून घेतात. पणन महासंघाने या संदर्भात ताकीद दिली असताना देखील सातत्याने कित्येक वर्षांपासून हा अवैध प्रमाणामध्ये काट कापण्याचे गैरकृत्य सुरू होते. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत जे व्यापारी हा प्रकार करीत आहेत, त्यांच्यावर तत्काळ स्वरूपात कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या अवैध, अवाजवी वसुलीपासून वाचवावे, अशी विनंती आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी कालच विधानसभेत सरकारला केली होती,