Home Breaking News आ.डॉ.आशीष देशमुख यांनी फेरो अलॉईज क्लस्टर व इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्सची विधानसभेत मागणी

आ.डॉ.आशीष देशमुख यांनी फेरो अलॉईज क्लस्टर व इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्सची विधानसभेत मागणी

32
0

नागपुर :-
सावनेर तालुक्यात फेरो अलॉईज क्लस्टर तर कळमेश्वर तालुक्यामध्ये इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स व्हावे, अशी मागणी या भागाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी विधानसभेत केली आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. यामुळे येथील बेरोजगारीवर आळा घातला जात आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यापासून जाणाऱ्या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात क्रांती यावी आणित्या माध्यमातून आपल्या येथील तरुण- तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्धव्हाव्यात, यास्वभाविकतेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला फायदा होताना दिसत आहे. आज मुंबईपासून गेलच्या माध्यमातून नॅचरल गॅस पाईप लाईन ही आपल्याला जबलपूर आणि ओरिसातून जाताना दिसते, ती नागपूर जिल्ह्यातून जाते. ती माझ्या मतदारसंघातून कळमेश्वर तालुक्यातून जाते. विशेष करून विदर्भाला, मराठवाड्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगढला लागणारी जी खतं आहेत अशावर आधारित आपल्या मध्यभारतात एकही फर्टीलायझर कारखाना नाही. नागपूरपासून ३५० कि.मी.पर्यंत एकही कारखाना नसल्यामुळे या नॅचरल गॅसच्या पाईप लाईनच्या भरोशावर आपण येथे मोठा इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स उघडावा, अशी विनंती पुरवणी मागणीच्या निमित्ताने आ. देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. त्या निमित्ताने शेतकऱ्यांना कमी दरात खते नक्कीच मिळतील. आणि रोजगाराच्या मोठ्या संधी याभागातील तरुण-तरुणींना मिळतील. सावनेर तालुक्यात मॅगनीजची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. मॉईलच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. ते भिलाईला जाऊन फेरो अलॉईज बनतो. आज मॉईलच्या माध्यमातून स्वतः गुंतवणूक करून तिथे फेरो अलॉईजचा कारखाना टाकण्यासंदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली आहे. कमी दरात विजेची उपलब्धता राज्य सरकारने करून द्यावी, अशी सरकारला विनंती आहे, जेणेकरून मॉईलला खापा येथे फेरो अलॉईज कारखाना सुरू करता येईल. फेरो अलॉईज क्लस्टरची देखील गरज विदर्भाला नक्कीच आहे.असे आमदार डॉ.आशीष देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here