नागपूर:-
सफाई कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सत्र 2021 -22 व 2022-23 मध्ये सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा नागपुर, येथे प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक असताना त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविलेली नसल्याने या विषयी तुषार गायकवाड यांनी मुख्यध्यापिका विरूद्ध आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर यांना तक्रार करून तत्कालीन मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत या कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, नागपर या शाळेतील प्रवेश प्रक्रिया पार पाडताना विद्यार्थ्यांचे पालक हे सफाई कामगार असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तथापि, उपरोक्त प्रमाणे या कार्यालयास प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार सदर सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, नागपूर येथील सन 2021-22 व 2022-23 मधील प्रवेश प्रक्रियेत बहुतांश विद्यार्थ्यांचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र नसतांना अनाधिकृतपणे प्रवेश दिल्याबाबत गंभीर स्वरुपाची बाब आढळून आलेली आहे.
सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, नागपुर येथील सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील विद्यार्थ्यांचे पालक हे सफाई कामगार म्हणून असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्रांचे आधारे प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तसेच शासनाने सदर शाळा ज्या समाजाच्या विशेषतः मेहतर, वाल्मिीकी, गंगी, सुदर्शन, कातडी सोलणारे इ. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होवून सर्वांगीण विकास होण्याचे दुष्टीकोनातून सुरू करण्यात आलेली असून त्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ४ इतकी आढळली. त्यामुळे सफाई कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सत्र २०२१-२२ व २०२२-२०२३ मध्ये सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, नागपूर येथे प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक असताना त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविलेली नसल्याने या विषयी तुषार गायकवाड यांनी मुख्यध्यापिका विरुद्ध आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर यांना तक्रार करून तत्कालीन मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
Home Breaking News शासकीय निवासी शाळा नागपुर येथील तत्कालीन मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर यांना त्वरीत निलंबीत...