Home Breaking News महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13
0

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रात टेक्नीकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना करणे, नवी दिल्ली येथे आयोजितमत भारत टेक्स २०२५ मध्ये सहभाग घेणे, टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागविणे तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.
हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या दृष्टीने वृध्दापकाळासाठी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करणेबाबत योजना तयार करावी. तसेच प्रसार भारती यांच्या सहकार्याने “करघा” या पारंपारिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करावा. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करून राज्यातील सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्याच्याही सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्नप व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here